कोकण रेल्वेसाठी सिंधुदुर्गातील नागरिकांच्या संपादित झालेल्या जमिनींच्या बदल्यात त्यांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्यासंदर्भात मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या शासकीय निवासस्थानी विशेष बैठक पार पडली.


कोकण रेल्वे प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक स्थानिक नागरिकांच्या जमिनी संपादित झाल्यानंतरही अद्यापही अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झालेल्या नाहीत. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने संबंधित प्रकल्पबाधित नागरिकांची स्वतंत्र यादी तयार करून त्यांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना रेल्वे अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या.
तसेच रेल्वे स्थानकांवरील स्टॉल तसेच अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्यांमध्ये प्रकल्पबाधितांना प्राधान्य देण्याबाबत रेल्वे प्रशासनाने तातडीने आणि प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
बैठकीस कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा, मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील नारकर उपस्थित होते.












