महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य सागरी आणि जलवाहतूक केंद्र बनविण्याच्या दृष्टीने, मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थित महाराष्ट्र सागरी मंडळामार्फत करण्यात आलेल्या ५६ हजार १७ कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत राज्यातील सागरी क्षेत्रातील विविध प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला.

राज्यातील बंदरविकास, जहाजबांधणी, जलवाहतूक आणि सागरी उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत १९ सामंजस्य करार केले आहेत. या प्रकल्पांमधून राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि रोजगारनिर्मिती होवू शकते. त्यामुळे महाराष्ट्राच्या सागरी क्षमतेचा पूर्ण वापर करून राज्याला जागतिक स्तरावरील सागरी हब बनविण्यासाठी सर्व प्रकल्पांच्या अंमलबजावणीकडे काटेकोर पद्धतीने लक्ष देऊन सर्व प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश यावेळी संबंधितांना दिले.
या बैठकीस महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. व संबंधित अधिकारी उपस्थित होते.












