नरडवे इंग्लिश स्कूलच्या नूतन वास्तूचे दिमाखात लोकार्पण; पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते सोहळा संपन्न

अखिल नरडवे ग्रामोद्धार संघ, मुंबई संचलित नरवडे इंग्लिश स्कूल, नरडवे येथील नूतन शाळा वास्तूच्या मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते वास्तुपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला . विद्यार्थ्यांना आधुनिक व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देणारी ही वास्तू निश्चितच ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासाला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.


याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत, अध्यक्ष जगन्नाथ सावंत, सरचिटणीस विजय सावंत, खजिनदार गणेश रावराणे, माजी जि.प.सदस्य सुरेश ढवळ, सरपंच गणपत सावंत, उपाध्यक्ष सुरेश परब, उपाध्यक्ष सुहास सावंत आदी उपस्थित होते.