कुडाळ पिंगुळी भूपकरवाडी येथे गोंधयाळे रस्ता परिसरातील एका मोकळ्या जागेत चिलीमद्वारे गांजा सेवन करणाऱ्या चार युवकांना कुडाळ पोलिसांनी पकडले यात तिघे १८ वर्षीय, तर एक १७ वर्षीय (अल्पवयीन) आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी केली याबाबतची फिर्याद पोलीस हवालदार मेघ:श्याम भिवा भगत यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली होती.
पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे कुडाळ शहरासह परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांना पिंगुळी भूपकरवाडी येथे एका रस्त्याच्या बाजूला तीन-चार युवक चिलीमद्वारे काही तरी अमली पदार्थ सेवन करीत असल्याची माहिती गुरुवारी रात्री मिळाली. त्यानुसार कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली हवालदार प्रमोद काळसेकर, महेश भोई, मेघ:श्याम भिवा भगत, विष्णू रामदास आदीचे पथक पिंगुळी भूपकरवाडी परिसरात दाखल झाले तेथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी
आडोशाला थांबून पाहणी केली असता, चार युवक चिलीम ओडत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तेथे छापा टाकून चौघांनाही ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यानी चिलीममधून गांजा सेवन केल्याची कबुली दिली. ताब्यात एक अल्पवयीन आहे,
पोलिसांनी चारही जणांची झडती घेतली असता त्यांच्याकडे अन्य कोणताही मादक पदार्थ आढळता नाही मात्र, त्यांनी गांजा सेवन केल्याचे स्पष्ट केल्याने त्यांना ताब्यात घेत कुडाळ पोलीस ठाण्यात आणले व त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली या प्रकरणी गुंगीकारक औषणी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ अंतर्गत कलम ८ (सी) व २७अन्वये गुन्हा दाखत करण्यात आता आहे











