कोकणशाही

कोकणशाही

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे दोडामार्ग येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

दोडामार्ग : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने रविवार, २४ मे रोजी दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आलेला भव्य गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून तालुक्याचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांचा…

वनविभागाची मोठी कारवाई; २९ घनमीटर खैर लाकूड जप्त, चालक गाडी टाकून पसार

सावंतवाडी : येथील वनविभागाच्या पथकाने थरारक पाठलाग करून खैर लाकडाची बेकायदेशीर वाहतूक करणारा टेम्पो जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे १२ ते १४ लाख रुपये किमतीचा २९ घनमीटर खैराचा साठा जप्त करण्यात आला आहे. वनविभागाच्या या धडक कारवाईमुळे लाकूड तस्करांचे…

नागपूर-मडगांव एक्स्प्रेसला कायमस्वरूपी हिरवा कंदील; रेल्वे बोर्डाची मंजुरी

नागपूर जंक्शन ते मडगांव (गोवा) दरम्यान धावणाऱ्या ०११३९/४० नागपूर मडगांव विशेष एक्स्प्रेसला नियमित करण्याची मंजुरी रेल्वे बोर्डाकडून देण्यात आली आहे. ही गाडी आता ११२०३/०४ नागपूर मडगांव रेल्वेगाडी म्हणून नियमित दर्जेने धावणार आहे.या गाडीचे वेळापत्रक असे असेलनागपूर जंक्शन ते मडगांव (गोवा):…

पराभवाच्या काळातही साथ कायम; आ. निलेश राणेंनी मानले सहकाऱ्यांचे ऋण

आमदार निलेश राणेंच्या राजापूर रत्नागिरी दौऱ्याच्या निमित्ताने रत्नागिरीचे सहकारी माझ्या कुटुंबाचा एक भाग आहेत. आ. निलेश राणे अनेक दिवसानंतर सगळ्यांना एकत्र भेटले .आमदार निलेश राणे सांगतात, आम्ही कोणत्याही पदावर असलो काय आणि नसलो काय या लोकांना कधी फरक पडला नाही,…

कसालच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पुन्हा सिद्ध; शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश

कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज कसाल येथील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. इयत्ता 5 वी व 8 वीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत पात्रता प्राप्त केली.इयत्ता 5…

सिंधुदुर्गातील बुद्धिबळपटूंना राज्य स्पर्धेचे दार खुले

सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कल आयोजित व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना संलग्नित सिंधुदुर्ग जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन २३ व २४ मे ला शिवाजीनगर, कणकवली येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेत ७ ९, ११, १३, १५ व १७ वर्षाखालील खुली व…

“श्री देव काळभैरवांच्या चरणी आ. निलेश राणे; रत्नागिरी दौऱ्यात घेतले दर्शन”

आमदार निलेश राणेंच्या राजापूर रत्नागिरी दौरा दरम्यान आ. निलेश राणेंनी रत्नागिरीच्या पवित्र भूमीत सुप्रसिद्ध असलेल्या श्री देव काळभैरव मंदिरात जाऊन मनोभावे पूजा करून दर्शन घेतले.यावेळी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रत्नागिरी-राजापूर दौऱ्यात आमदार निलेश राणेंनी दिली वसंत पाटील यांच्या निवासस्थानी भेट ; कार्यकर्त्यांशी साधला संवाद

आमदार निलेश राणेंच्या राजापूर रत्नागिरी दौऱ्याच्या निमित्ताने सहकारी श्री. वसंत यशवंत पाटील यांच्या राजापूर तालुक्यातील कशेळी गाव येथील त्यांच्या निवासस्थानी आमदार निलेश राणेंनी सदिच्छा भेट दिली.याप्रसंगी श्री. रवी नांगरेकर, श्री. दीपक बेंद्रे, श्री. परिमल भोसले, श्री. प्रसाद शेट्टे व अन्य…

“आमदार निलेश राणेंचा रत्नागिरी दौरा; किरण सामंतांसह कार्यकर्त्यांशी संवाद”

रत्नागिरी आणि राजापूरच्या दौऱ्यावर असताना, आमदार निलेश राणेंनी शिवसेना आमदार श्री. किरणजी सामंत तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना भेटलो.

“रत्नागिरीच्या धर्तीवर कुडाळमध्येही आधुनिक क्रीडा संकुल; आमदार निलेश राणेंचे मोठे पाऊल”

महाराष्ट्राचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. उदयजी सामंत यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी येथे उभारण्यात येत असलेले जिल्हा क्रीडा संकुल बघण्याची इच्छा होती.येत्या काळात रत्नागिरीप्रमाणेच कुडाळमध्ये अशा प्रकारचे आधुनिक क्रीडा संकुल उभारण्याचा आमदार निलेश राणेंचा प्रयत्न आहे.यावेळी आमदार निलेश राणे उपस्थित…