विशाळगडावर दिमाखात साजरा शिवराज्याभिषेक सोहळा; मंत्री नितेश राणेंची उपस्थिती

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त श्री विशाळगड येथे सकल हिंदू समाज, शाहुवाडी (कोल्हापूर) यांच्या वतीने आयोजित भव्य शिवराज्याभिषेक सोहळ्यास मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंना
उपस्थित राहण्याचा सन्मान लाभला.
विशाळगडाच्या पवित्र भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा वैदिक मंत्रोच्चारात विधिवत राज्याभिषेक होत असताना प्रत्येक शिवभक्ताच्या मनात अभिमान, श्रद्धा आणि स्वराज्याप्रती निष्ठेची भावना दाटून आली.
स्वराज्य हे केवळ एक राज्य नव्हते, तर ते स्वाभिमान, न्याय, धर्मरक्षण आणि रयतेच्या कल्याणासाठी उभारलेले पवित्र ध्येय होते. त्या तेजस्वी परंपरेचे आपण सर्व वारसदार आहोत. छत्रपतींचे विचार, त्यांचा त्याग आणि त्यांचे राष्ट्रकार्य प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचविणे, हेच त्यांना खरी मानवंदना ठरेल.
“जिथे जिथे भगवा फडकतो, तिथे तिथे शिवरायांचे विचार जिवंत राहतात.”