⚡ 📢 विजेचा वाढता धोका; पालघरकरांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा

पालघरः पालघर जिल्ह्यात गेल्या ११ वर्षांत वीज कोसळून तब्बल २७ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाढत्या विजेच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने ‘वीजेला समजून घेताना’ या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला.
जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे आणि निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या चर्चासत्रात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र, लातूरचे प्राध्यापक डॉ. प्रमोद पाटील यांनी विजेचा धोका, त्यामागील शास्त्रीय कारणे आणि बचावाचे उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.