मालवण : महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार तहसील कार्यालय, मालवणमार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१) अंतर्गत मालवण नगरपालिका व मालवण महसूली मंडळ स्तरावर शुक्रवार, ८ मे रोजी सकाळी १० वा. मालवण शहरातील रघुनाथ देसाई तालुका स्कुल सभागृह येथे महसूल शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती तहसीलदार गणेश लव्हे यांनी दिली.
मालवण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व महिलांसाठी महसूल विभागातील महत्वाच्या १५ सेवांचा लाभएकाच दिवशी देण्यासाठी हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुकीची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८-अ वाटप, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉ न-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (एनए) परवानगी, अकृषिक तरतुदीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. संबंधित सेवाविषयक अर्जही स्विकारण्यात येणार आहेत. नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी या शिबिराला आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून महसूल विभागाच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार गणेश लव्हे यांनी केले आहे. या शिबिरात आरोग्य तपासणीही करण्यात येणार आहे. यात रक्त तपासणी, शुगर, ब्लडप्रेशर, इसीजी याही मोफत तपासण्या होणार आहेत. शहरातील आणि मंडळातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असेही महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.
ठळक घडामोडी










