तिर्लोट (ता. देवगड) येथील ग्रामपंचायत (ग्रामसचिवालय) नव्या इमारतीचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते फलकाचे अनावरणही करण्यात आले.

ग्रामपंचायती सक्षम झाल्या पाहिजेत, कारण ग्रामपंचायत हीच लोकविकास आणि ग्रामविकासाची केंद्रे आहेत. गावातील सर्व प्रशासकीय कामकाज एकाच छताखाली झाल्यास नागरिकांना सेवा देणे अधिक सुलभ होते. त्यामुळे सुस्थितीत आणि सुसज्ज ग्रामपंचायत इमारती ही काळाची गरज आहे, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास देवगड तालुका सभापती गणेश राणे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, गटविकास अधिकारी श्री. चव्हाण, तसेच अमोल तेली, रवी पाळेकर, सरपंच सौ. रितिका रामकृष्ण जुवाटकर, उपसरपंच श्री. राजन मधुकर घाडी, मंडल अध्यक्ष बंड्या नारकर, बाळ खडपे, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे गटनेते संजय बोंबडी, भूषण पोकळे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.












