महाराष्ट्र दौऱ्यावर असलेली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची ‘युवाशक्ती जागर यात्रा’ आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाली आहे.
भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे जिल्ह्यात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
या भेटीदरम्यान जिल्ह्यातील संघटनात्मक बळकटीकरणावर भर देत, युवा मोर्चाच्या आगामी उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले.
या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, लखमराजे भोसले, श्वेता कोरगावकर, दिलीप तळेकर यांसह अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ही ‘युवाशक्ती जागर यात्रा’ राज्यभरातील युवकांमध्ये जागर निर्माण करत संघटन अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.












