सावंतवाडीत भाजपाला बदनाम करण्याचा शिंदे सेनेचा डाव फसला | kokanshahi |

साईनाथ गांवकर / सावंतवाडी

सावंतवाडीत झालेल्या आजच्या राड्याने सावंतवाडीकरांची अन सावंतवाडीच्या संस्कृतीची मान अक्षरशः शरमेने खाली घातलीय. निवडणुकीत विशाल परब यांच्या नेतृत्वात भाजपचे वाढते बळ सहन न झाल्याने याचा मनात राग ठेवून जाणीवपूर्वक पद्धतीने घातला गेलेला आजचा राडा पोलीस यंत्रणेसाठी तपासाचे आव्हान देणारा तर ठरलाच आहे पण सिंधुदुर्गचे राजकारण पुन्हा राडा संस्कृतीच्या दिशेने जातेय याचे दुःख सावंतवाडीकर आता व्यक्त करतायत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार मुळात भाजपचे विशाल परब यांच्याकडून पैसे वाटले जातं असल्याच्या संशयातून बॉडीगार्डची गाडी थांबवण्यात आली. पण प्रत्यक्षात मात्र गाडीत कोणतीही कॅश आढळली नाही. तरीही शिंदे सेनेच्या संजू परब आणि कार्यकर्त्यांकडून तिथे विशाल परब यांच्या ड्रायव्हरला मारहाण झाली. त्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांसमक्ष राडा झाला. ही वास्तविकता वाजुला सारून शिंदे सेनेकडून भाजपाला बदनाम करण्याच्या या फसलेल्या डावाची सावंतवाडीसह सिंधुदुर्गजिल्ह्यात चर्चा सुरु झालीय.