महान गावात उबाठा शिवसेनेला धक्का ; कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश । Kokanshahi ।

मालवण तालुक्यातील महान गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसला. महान गावातील उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजप तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, बाबा परब, मंदार केणी व अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला. यानिमित्ताने येथील पदाधिकारी नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. वैभव चव्हाण यांची तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
हरीश गावडे (बाबू), प्रशांत साळूखे, रामचंद्र नेरकर, गणेश चव्हाण, चेतन साळसकर, विदयाधर नेरकर, विनोद गावडे, भगवान सावंत, जयेश गावडे, सिद्धार्थ गावडे, शरद गावडे, संदीप गावडे, गणेश चव्हाण, बाळकृष्ण घाडी, सुनील घाडी, गौरव राणे, विलास ठाकूर, जयराम घाडी, शंकर गावडे, गोविंद साळुंखे, रमेश घाडी यानी भाजपात प्रवेश केला. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, बंडू गावडे, जगू सावंत आदिंसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कोकणशाही