कुडाळ पणदूर ओव्हरब्रिज वर भीषण अपघात

कुडाळ

मुंबई – गोवा महामार्गावरील पणदूर ओव्हरब्रिज येथे आज भरधाव वेगातील एका कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील पाच प्रवासी जखमी झाले असून, कारचे मोठे नुकसान झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर कार कणकवलीच्या दिशेने प्रवास करत असताना हा अपघात झाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कार भरधाव वेगात असल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
या अपघातामुळे कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून, अपघातानंतर तातडीने स्थानिकांनी आणि महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना तत्काळ उपचारासाठी ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघाताच्या अधिक तपास कुडाळ पोलीस करत आहेत. कोकणशाही