कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार सोहळा संपन्न.

कुडाळ शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्यावतीने प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न

कुडाळ तालुक्यातील नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार सोहळा आज रोजी कुडाळ एम.आय.डी.सी या ठिकाणी संपन्न झाला. शहरातील प्रमुख पदाधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक मूर्ती प्रेम व पुष्पगुच्छ देऊन हा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कुडाळ तालुक्याचे प्रमुख आकर्षण असलेल्या शिवसेना कुडाळ शहराच्या वतीने नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी यांचा सत्कार सोहळा आज रोजी संपन्न झाला.

ह्या मध्ये आंबड जिल्हा परिषद, पावशी जि.प सदस्य, वेताळ बांबर्डे जि प सदस्य, घावनळे जि प सदस्य, माणगाव जि. प इत्यादी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य यांचा सत्कार सोहळा कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. ह्या मध्ये शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ.दिपलक्ष्मी पडते, श्री दादा साईल,श्री नागेश आईर, जिल्हा परिषदेचे गटनेते दीपक नारकर, श्री रुपेश कानडे ह्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला तसेच कुडाळ पंचायत समिती शिवसेनेचे सदस्य श्री निखिल कांदळगावकर, श्री मिलिंद नाईक, गोटोस पंचायत समितीचे सदस्य व अन्य सदस्यांचे सत्कार कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने करण्यात आले. त्यावेळी उपस्थित कुडाळ शहराचे माजी नगराध्यक्ष ओंकार तेली, कुडाळ शहर शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे,गटनेते नगरपंचायत तथा नगरसेवक विलास कुडाळकर, आडवोकेट नगरसेवक राजीव कुडाळकर,महिला शहर प्रमुख नगरसेविका सौ श्रुती वर्दम, माजी उपनगराध्यक्ष आबा धडाम, माजी नगरसेवक राकेश कांदे, उपशहर प्रमुख चेतन पडते, माजी नगरसेविका सौ साक्षी सावंत, सौ.रेखा काणेकर, कुडाळ शहर शाखाप्रमुख योगेश काळप, प्रथमेश कांबळे, सोशल मीडियाचे राजवीर पाटील, चंदन कांबळी आदी शहरातील पदाधिकारी व लोकप्रतिनिधी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.