मालवण तारकर्ली देवबाग मार्गांवर एसटी बससेवा फेऱ्यांची स्थगिती पूर्ववत

मालवण : पर्यटन हंगामात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मालवण तारकर्ली देवबाग मार्गावरील एसटी बससेवा प्रशासनाकडून बंद करण्यात आली होती. दरम्यान या मार्गावर एसटी सेवा पूर्वरस सुरू व्हावी, यासाठी आमदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव सावंत यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार या मार्गावरील एसटी बस सेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.
गुरुवार ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी मालवण तारकर्ली एसटी बसफेरी सुरु होईल. तसेच शुक्रवार ३१ ऑक्टोबरपासून मालवण तारकर्ली देवबाग एसटी बस फेऱ्या पूर्ववत सुरू होणार आहे, अशी माहिती मालवण एसटी प्रशासनाकडून देण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबरपासून शाळाही पुन्हा सुरु होत असून विद्यार्थी वर्गासह सर्वांनाच या एसटी फेऱ्यांचा लाभ होणार आहे. कोकणशाही मालवण