कोकणशाही

कोकणशाही

कोकण मार्गावर दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत करण्यास मुख्यमंत्र्यांना निवेदन

कोरोनाच्या संकटापासून मध्य रेल्वेने बंद केलेली कोकणवासियांच्या हक्काची दादर-रत्नागिरी पॅसेंजर पूर्ववत करून कोकणवासियांना दिलासा द्यावा, अशा मागणीचे निवेदन अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले. या मागणीचा गांभिर्याने विचार करावा, असे साकडेही घालण्यात आले आहे.…

मंत्री नितेश राणेंचे उद्धव ठाकरेंना एक्स ट्विट द्वारे खुले आवाहन

मंत्री नितेश राणेंनी नवं वर्ष सुरवातीस उद्धव ठाकरेंना एक्स ट्विट द्वारे दिले खुले आवाहन ”जितकी मिर्ची ठाकरे गटाला.. उत्तर भारतीय महापौर ची लागली..तितकी मिर्ची बुरखे वाली महापौर बनेल ची का लागली नाही ?यांनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतलेली दिसते..बाकी..मुंबई चा…

नववर्षाची भक्तीमय वातावरणाने सुरुवात, मंदिरात भाविकांची मांदियाळी

मुंबई: नवीन वर्षाची सुरुवात आनंद, आशा आणि सकारात्मकतेने व्हावी या भावनेतून देशभरातील लाखो भाविकांनी पहिल्याच दिवशी मंदिरांकडे धाव घेतली आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी देवदर्शन घेण्याची परंपरा अजूनही तितकीच जिवंत असल्याचे चित्र आज पाहायला मिळतंय.पहाटेपासूनच विविध धार्मिक स्थळांवर भाविकांची गर्दी वाढू लागली…

२०२६ नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाई, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ

मुंबई : सरलेल्या २०२५ मध्ये महागाईमुळे सर्वसामान्यांचं कंबरडं मोडलं होतं. आता २०२६ या नव्या वर्षाची सुरुवातही महागाईच्या झटक्याने झाली आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी तेल कंपन्यांनी एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. ही वाढ दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या…

सावंतवाडी भाजपच्या वतीने जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या कडे स्वतंत्र गट स्थापन पत्र सादर ; नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांची एकमताने निवड

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजप पक्षाच्या वतीने निवडणूक लढून विजय मिळविलेल्या थेट नगराध्यक्षा तसेच ११ नगरसेवकांनी आज अधिकृत पणे स्वतंत्र गट स्थापन केला. या गट स्थापनेबाबतचे पत्र बुधवारी जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांच्या कडे सादर करण्यात आले. सावंतवाडी नगरपरिषद…

हुंबरट तिठ्यावर अपघात ; दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू

कणकवली : गोव्याहून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वाराने ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून जाणाऱ्या चिरेवाहू ट्रकला मागाहून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला. अमन गणी खतिक (२२, रा. राजापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. हा अपघात मुंबई-गोवा…

२०२६ या नववर्षाचे आनंदाने आणि उत्साहाने स्वागत करूया – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यातील तमाम बंधू – भगिनींनो,गोड आणि कटू अशा अनेक संमिश्र क्षणांनी एकवटलेले २०२५ हे वर्ष आता सरत आलंय, तर दुसरीकडे नव्याने उभारी घेण्याची उत्तुंग स्वप्नं दाखवणारे २०२६ साल आपल्याला खुणावत आहे. आपण सर्वजण नवी स्वप्नं, नवी आशा, नव्या आकांक्षा, नवे…

देवगड जामसंडे नगरपंचायत विषय समिती सभापती निवड जाहीर

देवगड : या निवडणुकीत स्वच्छता व आरोग्य सभापतीपदी निवृत्ती उर्फ बुवा तारी, पाणी पुरवठा सभापतीपदी सौ. तन्वी चांदोस्कर, बांधकाम सभापतीपदी रोहन खेडेकर, तर महिला व बालकल्याण उपसभापतीपदी सौ. मनीषा जामसंडेकर यांची बिनविरोध निवड जाहीर झाली. देवगड | देवगड–जामसंडे नगरपंचायतीच्या विषय…

‘हाउसफुल्ल’, नवीन वर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनारे व पर्यटनस्थळे सज्ज!

रत्नागिरी दापोली : नाताळ व नववर्षाच्या सलग सुट्ट्या, थंड व आल्हाददायक हवामान आणि निसर्गसौंदर्याची भुरळ यामुळे दापोली तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. तालुक्यातील प्रमुख समुद्रकिनारे व पर्यटनस्थळे सध्या अक्षरशः ‘हाउसफुल्ल’ झाली असून पर्यटन व्यवसायाला सुगीचे दिवस…

टेरव येथे बिबट्याची दहशत, नागरिकांनी सतर्क राहण्याचे सरपंचांचे आवाहन

चिपळूण – टेरव : आवश्यक खबरदारी घेण्याचे सरपंच किशोर कदम यांचे आवाहन चिपळूण तालुक्यातील टेरव परिसरात सध्या बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांनी सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन टेवचे सरपंच किशोर कदम यांनी केले आहे.टेरव गाव जंगलालगत…