सावंतवाडी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीने दणदणीत विजय मिळवला. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा भाजप पदाधिकाऱ्यांनी विशेष सन्मान केला.
सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, नवनिर्वाचित जि. प. सदस्य संदीप गावडे, भाजप युवा नेते विशाल परब, विनोद राऊळ, नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य गौरव मुळीक, समीर नेमळकर आदींनी चव्हाण यांची सदिच्छा भेट घेत शुभेच्छा दिल्या.
यावेळी त्यांनी सर्व नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले. तसेच जनसेवेच्या मार्गावरील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.












