सावंतवाडी प्रतिनिधी २८
सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात बंद पडलेल्या डायलिसिस मशीन व आर ओ प्लांट साठी १५ लाखाचा निधी माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी मंजूर केला आहे. यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी पाठपुरावा केला होता. याबाबतची माहिती त्यांनी दिली तसेच दीपक केसरकर यांचे आभार मानले आहेत.रुग्णालयातील डायलिसिस मशीन बंद तसेच आरओ प्लांट बंद असल्यामुळे त्याचाही फटका होता त्यामुळे या दोन्ही मशीन सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली रक्कम देण्यात यावी, अशी मागणी ही मसूरकर यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्याकडे केली. त्यानुसार हे पैसे मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे लवकरच दोन्ही मशीन सुरू होतील, असा विश्वास मसुरकर यांनी व्यक्त केला आहे.










