सिंगधुदुर्ग प्रतिनिधी २८
आपल्या विविध मागण्या व समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रविवारी प्रजासत्ताकदिनी जि. प. भवन व जिल्हाधिकारी कार्यालय येथे 25 उपोषणे झाली. प्राजासत्ताक दिनाचे ध्वज फडकल्यानंतर पालकमंत्री नीतेश राणे, जिल्हाधिकारी, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक तसेच संबधित खातेप्रमुखांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करत त्यांच्या मागण्या, समस्या जाणून घेतल्या. ना. नितेश राणे यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या, समस्या सोडविण्यांसाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश जि. प. व जिल्हा प्रशासनाला दिले.पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रजासत्ताक दिनाच्या आदल्यादिवशी सिंधुदुर्गनगरी येथे उपोषणकर्त्यां नागरीकांशी चर्चा करत त्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यामुळे नियोजित 70 उपोषणे पालकमंत्र्यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आली. मात्र ना. राणेंशी झालेलेया चर्चेत समाधान न झाल्याने रविवारी सिंधुदुर्गनगरीत 25 उपोषणे झाली. यात जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर पाच तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वीस उपोषणांचा समवेश होता. पालकमंत्री नितेश राणे यांनी अधिकाऱ्यांसमवेत या उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. उपोषण कर्त्यांचे काही प्रश्न, मागण्या, समस्या गंभीर दखलपात्र आहेत. अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या समस्या उद्भवल्या आहेत. पाणी अडविण्यासाठी बांधलेले अनेक बंधारे आज कोरडे पडले आहेत. जलजीवन मिशनच्या अनेक योजना अद्यापकार्यान्वित झालेल्या नाहीत. काही कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत.










