✒️ कोकणशाही न्युज चॅनल !
📕 ब्युरो न्युज रिपोर्ट
नवी दिल्ली दि. २६
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने पोलीस पदकांची घोषणा झाली. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण ४८ पोलिसांना विविध पदके जाहीर झाले. यापैकी ४ पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, तर ४४ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ जाहीर झाले. यातील ३९ पोलीस पदके गुणवत्तापूर्ण सेवेसाठी तर ५ पदके कारागृहात सेवा बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना सुधारात्मक सेवांच्या श्रेणीत गुणवत्तापूर्ण सेवेसाठी जाहीर झाली आहेत.प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस पदके’ जाहीर केले जातात. यावर्षी एकूण ९४२ ‘पोलीस पदके ‘ जाहीर झाली असून देशभरातील एकूण १०१ पोलिसांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’, ९५ पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ आणि ७४६ पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदके जाहीर करण्यात आली.










