सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंसाठी एक हक्काचं मैदान; पालकमंत्री नितेश राणे यांची ग्वाही…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खेळाडूंसाठी एक हक्काचं मैदान असावं यासाठी मी राणे साहेबांशी बोललो आहे. ते देखील त्यासाठी सकारात्मक आहेत. त्यामुळे लवकरच त्याबाबत कार्यवाही होईल अशी ग्वाही पालकमंत्री नितेश राणे यांनी आज दिली. ते कलमठ येथील संदीप मेस्त्री मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धा कार्यक्रमात बोलत होते.राणे म्हणाले की, कोकणाचा आवाज भारतीय संघात देखील आला पाहिजे. यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. त्याचबरोबर लोकाभिमुख काम करत असतानाच संदीप मेस्त्री मित्रमंडळाने क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून जिल्ह्यातील असंख्य युवकांना व्यासपीठ मिळवून दिले त्याबद्दल संदीप मेस्त्री मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन व कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.भाजपा युवा मोर्चा पुरस्कृत व संदीप मेस्त्री मित्रमंडळ आयोजित क्रेझी बॉईज क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने पालकमंत्री नितेश राणे यांनी आज सदिच्छा भेट दिली. त्या प्रसंगी पालकमंत्री नितेश राणे बोलत होते यावेळी सार्वजनिक बांधकाम अभियंता अजयकुमार सर्वगोड, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, अशिये सरपंच महेश गुरव, कलमठ उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, प्रकाश सावंत, संदीप मेस्त्री मित्रमंडळाचे अध्यक्ष तेजस लोकरे, प्रज्वल वर्दंम, ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार, समीर कवठकर, परेश कांबळी आदींसह कार्यक क्रीडा रसिक उपस्थित होते.