ग्रामीण शिक्षणात क्रांती युवाफोरमकडून आकेरी जिल्हा परिषद शाळेला स्मार्ट टीव्हीची भेट

गणतंत्र दिनानिमित्त युवाफोरमकडून ग्रामीण शिक्षणात क्रांतीची सुरुवातआज, २६ जानेवारी, गणतंत्र दिनानिमित्त युवाफोरम संस्थेने ग्रामीण शिक्षण सुधारण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. प्राथमिक शाळांना ई-लर्निंग साधनांनी सुसज्ज करण्याच्या उपक्रमांतर्गत, आकेरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला.या कार्यक्रमास शाळा प्रशासन, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, ग्रामस्थ, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.स्मार्ट टीव्हीचे वितरण युवाफोरमकडून करण्यात आले, जिथे अॅड. यशवर्धन राणे, अमोल निकम, अॅड. हितेश कुडाळकर, भूषण गावडे, केतन शिरोडकर, भूषण मेस्त्री, रोनक दलवी, शुभम वेंगुर्लेकर आणि रोहन कर्मळकर उपस्थित होते.युवाफोरमच्या अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील शिक्षण पद्धतीत लक्षणीय बदल होत असून प्राथमिक शाळांना नवी दिशा मिळत आहे. युवाफोरमच्या या प्रयत्नांमुळे शिक्षणाची पातळी उंचावण्याचे काम वेगाने सुरू आहे.