दोडामार्ग : तिलारी धरण हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे. धरण पूर्ण झाले मात्र भ्रष्ट अधिकारी कालव्याच्या कामात भ्रष्टाचार करून मलिदा खाण्यात व्यस्त आहेत. कालवा फुटीचे ग्रहण यामुळेच लागले असून ज्याठिकाणी गेल्या वर्षी दुरुस्ती केली होती त्या उन्नेयी बंधाऱ्याच्या उजव्या कालव्याची पाईपलाईन कोसळणे हे याचे उत्तम उदाहरण आहे. मात्र आता बस्स झाले. यासाठी प्रकल्पाचे अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे, अशा आशयाचे निवेदन जि.प.चे माजी समाज कल्याण माजी सभापती अंकुश जाधव यांनी पालकमंत्री नीतेश राणे यांच्याकडे दिले आहे.










