तिलारी डाव्या कालव्याला पडले मोठे भगदाड ; सहा महिन्यांपूर्वीच करण्यात आले होते काम…

दोडामार्ग : दि, २४

तिलारी डाव्या कालव्याला (Tilari Canal) भोमवाडी येथे भगदाड पडल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. गतवर्षी ज्या ठिकाणी काम करण्यात आले होते, नेमके त्याच्या विरुद्ध दुसऱ्यांदा हा कालवाफुटला.कालव्याच्या भिंतीला भले मोठे भगदाड पडल्याने कालव्यातील पाण्याचा लोट शेतकऱ्यांच्या बागेत शिरला. तसेच साटेली-भेडशी – भोमवाडी – कुडासे रस्त्यावर पाणी आल्याने नाल्याचे स्वरूप प्राप्त आले होते.कालव्यालगतच्या शेती-बागायतीचे मोठे नुकसान झाले आहे. सहा महिन्यापूर्वीच या कालव्याचे काम करण्यात आले आणि त्याच ठिकाणी पुन्हा एकदा मोठे भगदाड पडल्याने पाटबंधारे विभागाच्या कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे पुन्ह एकदा सिद्ध झाले आहे.