सिंधू संजीवन संस्था, देवगड पुरस्कृत “हर घर भगवत गीता” उपक्रम….

“हर घर भगवत गीता” उपक्रमा अंतर्गत शालय विद्यार्थ्यांना भगवतगीतेचे विनामूल्य वितरण आयोजक सिंधू संजीवन संस्था, देवगड व पुरस्कृत आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ मुंबई. यांच्या तर्फे करण्यात येत आहे.

आधुनिक जीवनशैली आणि तणावपूर्ण जीवनात जीवन कसे जगावे याचा मार्गदर्शक ग्रंथ म्हणून भगवतगीता महत्त्वाचा ठरतो. जीवनाचे आदर्श तत्त्वज्ञान आणि सुखी जीवनाचा मार्ग दाखवणाऱ्या भगवतगीतेचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सिंधू संजीवन संस्था देवगड आणि आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ मुंबई यांच्या वतीने ‘हर घर भगवतगीता’ हा उपक्रम राबवला जात आहे.

सदर उपक्रमा अंतर्गत देवगड तालुक्यातील कुणकेश्वर, तळेबाजार, वाडा, फणसगाव या गावातील हायस्कूलमधील इयत्ता ७ ते १० च्या विद्यार्थ्यांना विनामूल्य भगवतगीता वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचे पालक, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि आजूबाजूच्या गावांतील मान्यवर उपस्थित राहावे .

कार्यक्रमाचा उद्देश मुलांना भगवतगीतेच्या आध्यात्मिक शिक्षणाचा लाभ मिळवून जीवनातील नैतिक मूल्यांचा आधार देणे हा आहे. या निमित्ताने भावी पिढीला भारतीय संस्कृतीचे महत्त्व समजावून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे महत्त्व:
• विद्यार्थी आणि पालकांना भगवतगीतेचे मार्गदर्शन
• संस्कारक्षम जीवनाचा संदेश
• समाजातील व्यक्तींना एकत्रित आणणारा उपक्रम

सर्व संबंधितांनी आपली उपस्थिती लावून उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन संस्थेच्या सर्व तालुकवासीयाना केले आहे.

भगवत गीता वितरण सोहळा

२४/०१/२०२५ शुक्रवार
सकाळी ११.०० वा.
वाडा हायस्कूल

दुपारी 3.00 वा.
तळेबाजार हायस्कूल

२५/०१/२०२५ शनिवार
सकाळी ९.०० वा.
फणसगाव हायस्कूल

दुपारी ११.३० वा.
कुणकेश्वर मंदिर

संपर्क:
9819778525 / 9119689696 / 7783968888