📕KOKANSHAHI NEWS CHANNEL |
✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग
सावंतवाडी : दि २०,
उडेली येथील धरण प्रकल्पामुळे सावंतवाडीतील पाण्याचा भविष्यातील प्रश्न सुटणार आहे. येथील निसर्गरम्य परिसर बघून अनेक पर्यटक नक्कीच उडेली-घारपी गावात येतील आणि पर्यटन वाढीस लागेल, असा विश्वास माजी मंत्री, आ. दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. घारपी गावासाठी स्वतंत्र केटीव्हीआर बंधारा बांधून पाणी प्रश्न सोडविण्यात येणार असून यासाठी सर्व्हेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.उडेली येथील मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने उभारण्यात येत असलेल्या धरण प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी आ. केसरकर यांच्या उपस्थितीत धरण स्थळावर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडले.










