पालकमंत्री नितेश राणे यांचा पहिल्याच दौऱ्यात ‘मास्टर स्ट्रोक’

साईनाथ गांवकर / सिंधुदुर्ग

पालकमंत्री नितेश राणे हे 20 जानेवारी रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहे. सिंधुदुर्गचे पालकमंत्री झाल्यानंतर ते प्रथमच सिंधुदुर्गात येत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याला नेमकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता सर्वप्रथम आहे याचा प्राधान्यक्रम अन त्याबाबतची ब्लु प्रिंट मंत्री नितेश राणे यांच्याकडे तयार असल्याचे पहिल्याच जिल्हा दौऱ्यातून स्पष्ट होतं आहे. सिंधुदुर्गातील ठिकठिकाणी नदी पात्रात गाळ साचल्याने पावसात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होतं असते. याचेच भान ठेवून पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पहिलीच बैठक गाळ काढणे या विषयावर लावली आहे. मंत्री नितेश राणे यांचा हा सामाजिक कार्याचा ‘मास्टर स्ट्रोक’ यावर्षीच्या पावसाळ्यात सर्वसामान्य सिंधुदुर्गवासियांना सुखावणारा ठरेल एवढं निश्चित!