देवगड : हिंदुहृदयसम्राट, शिवसेनेचे संस्थापक आणि लाखो शिवसैनिकांचे प्रेरणास्थान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देवगड तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख रविंद्र जोगल , युवासेना तालुकाप्रमुख गणेश जगदीश गांवकर, उपतालुकाप्रमुख विष्णू (दादा) सावंत, युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन पवार, विक्रांत नाईक, प्रकाश ताडवे, उपशहरप्रमुख अकुश सावंत, विश्वास गणपत परब , प्रसाद दुखडे , ओंकार सावंत, शाखाप्रमुख गौरव सावंत, ग्रामपंचायत सदस्य विनीता सावंत,प्रथमेश तावडे,सचिन गोपाळ पवार, जगन्नाथ घाडी,अमित साळगांवकर आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हक्कासाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि सर्वसामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या विचारांचा आणि हिंदुत्वाच्या लढ्याचा वारसा पुढे घेऊन जाण्याचा निर्धार यावेळी शिवसैनिकांनी व्यक्त केला.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन!












