राजापूर;अनधिकृत मदरसा प्रकरणात स्थानिक प्रशासनाची बोटचेपी…

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL |

✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग

राजापूर : दि: १८

राजापूर शहरालगतच्या धोपेश्वर पन्हळे येथील अनधिकृत मदरसा प्रकरणात स्थानिक प्रशासनाची बोटचेपी भूमिकाच कारणीभूत असल्याची माहिती आता पुढे आली आहे. केवळ धर्मादाय आयुक्तांकडे असलेल्या संस्थेच्या नोंदणी व्यतिरीक्त मदरसा चालविणेबाबत व अन्य बाबींबाबत अन्य कोणतीही परवानगी संबधित मदरसा चालकांकडे नसल्याची बाब उघड झाली आहे. असे असतानाही गेली दिड ते दोन वर्षे स्थानिक ग्रामस्थांनी सदरचा अनधिकृत मदरसा बंद करण्याची वारंवार मागणी करूनही स्थानिक प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष करत अशा प्रकारे या ठिकाणी अनधिकृत मदरसा चालविण्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांतून होत आहे.
तर धर्मादाय आयुक्तांकडील या संस्थेची नोंदणी प्रस्तावात पत्ता राजापूर शहरातील आणि मदरसा सुरू धोपेश्वर पन्हळे परिसरात हा काय प्रकार असा सवाल उपस्थित केला जात असून या मदरशात परराज्यातील मुले असून त्यांची संख्या ६० इतकी असल्याची माहिती पुढे आली आहे. अशा प्रकारे राजापुरात येऊन परराज्यातील मुलांनी या मदरशामध्ये शिक्षण घेण्याचा हा प्रकार नेमका काय आहे याची माहिती प्रशासनाने घ्यावी अशी मागणी होत आहे.