📕KOKANSHAHI NEWS CHANNEL |
✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग
सावंतवाडी, दि: १८
गोरगरीब लोकांना चांगले उपचार मिळण्यासाठी शासकीय रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांना चांगला पगार द्या, अशी मागणी सावंतवाडीतील सामाजिक कार्यकर्ते राजू मसुरकर यांनी विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांच्याकडे केली आहे. दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोजगार देणारे प्रकल्प नसल्यामुळे येथील मुले अन्य जिल्ह्यासह गोवा राज्यात कामासाठी जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी रोजगार आणण्यासाठी भर द्या, अशी मागणी त्यांनी केली.
श्री. नार्वेकर हे काल सावंतवाडी दौऱ्यावर होते. यावेळी मसुरकर यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी अन्य विविध विषयावर चर्चा करण्यात आली यात आरोग्य आणि रोजगाराच्या मुद्द्यावर जिल्ह्याचे सुपूत्र म्हणून तुम्ही लक्ष घाला, अशी मागणी मसुरकर यांनी केली.










