📕KOKANSHAHI NEWS CHANNEL |
✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग
सावंतवाडी दि: १८
सावंतवाडी, तालुक्यातील वेर्ले आणि उडेली येथे दोन धरण प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा आज माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभाग, लघुपाटबंधारे योजनेंतर्गत वेर्ले व उडेली येथे हे प्रकल्प होणार आहेत. या दोन धरण प्रकल्पामुळे सावंतवाडी तालुक्यात विकासाची गंगा येणार असल्याचे शिंदे सेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी सांगितले.










