आ. निलेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षाचा होणार भव्य कार्यकर्ता मेळावा !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL |

✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग

मालवण : दि: १८

कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघात शिवसेना पक्ष बांधणीच्या दृष्टीने आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार दि. २१ जानेवारीला सकाळी ११ वाजता इच्छापूर्ती मंगल कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे शिवसेना पक्षाचा भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यासाठी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह शिवसेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याला शिवसेना पेक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केले आहे.