अभिनेता सैफअली खानवर राहत्या घरी चाकू हल्ला,,

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL |

✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग

मुंबई दि . १६

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर 16 डिसेंबरच्या मध्यरात्री 2.30 एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला. सैफ अली खानच्या मुंबईतील राहत्या घरी एका अज्ञात व्यक्तीने हा प्राणघातक हल्ला केला. अज्ञाताच्या चाकूहल्ल्यात सैफ अली खानच्या मानेवर तब्बल 10 सेंटीमीटरचा वार झाला. तसेच सैफ अली खानचा हात आणि पाठीवरही जखम झाली. या हल्ल्यात सैफ अली खानच्या पाठीत शस्त्र रुतलेलं होतं. रुतलेलं शस्त्र काढण्यासाठी लिलावती रुग्णालयात सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या सैफ अली खानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती लिलावती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. 

सैफ अली खानवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी तपासासाठी  मुंबई  पोलिसांच्या सात टीम कामाला लागली आहे. क्राईम ब्रँचचे अधिकारी दया नायकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. सैफ अली खानच्या घराबाहेर पोलीस तपास करत आहे.