📕KOKANSHAHI NEWS CHANNEL |
✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग
सावंतवाडी, दि. १५ः
मळगाव येथे उभ्या असलेल्या लक्झरी बसला वेगाने येणाऱ्या डंपर चालकाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात डंपर चालक गाडीतच अडकला तर त्या गाडीत लक्झरी बसचे काम करणारा बस चालक व अन्य एक सहकारी प्रवासी जखमी झाला आहे. ही घटना आज रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मळगाव ब्रीजवर झाराप – – पत्रादेवी महामार्गावर घडली. दरम्यान त्या चालकासह अन्य जखमींना अधिक उपचारासाठी सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे.










