📕KOKANSHAHI NEWS CHANNEL |
✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग
रत्नागिरी : दि . १६
जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यात क्षयरुग्ण शोध मोहीम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेंतर्गत जोखमीग्रस्त भागातील 1 लाख 59 हजार 299 जणांची तपासणी करण्यात आली होती. यामध्ये 3 हजार 659 संशयित क्षयरुग्ण म्हणून सापडले होते. यापैकी फक्त 34 अंतिम निदान झालेले रुग्ण सापडले. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह व मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या सूचनेनुसार तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा प्र. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जोखीमग्रस्त भागातील क्षयरोग निदानापासून वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांना गृहभेटीद्वारे शोधण्यासाठी आरोग्य विभागामार्फत दि. 23 डिसेंबर 2024 ते 3 जानेवारी 2025 दरम्यान सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहीम यशस्वीरित्या राबविण्यात आली. या मोहिमेत जोखीमग्रस्त भागातील एकूण 1,59,299 लोकसंख्येची तपासणी झाली असून त्यापैकी 3,659 संशयित क्षयरुग्ण व्यक्ती आढळल्या. या संशयित क्षयरुग्णांपैकी अंतिम निदान झालेले 34 क्षयरुग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरु झाले आहेत अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी दिली आहे.










