नारायण राणे आणि एकनाथ शिंदे यांना ‘दि ग्रेट मराठा’ पुरस्कार जाहीर !

📕KOKANSHAHI NEWS CHANNEL |

✒️ब्युरो न्यूज | कोकणशाही न्यूज ब्रेकिंग

रत्नागिरी : दि . १६

महाराष्ट्र आणि त्याबाहेरील ५७ मराठा मंडळे किंवा त्यांच्या संस्थांनी २०१५ साली एकत्र येऊन स्थापन केलेल्या अखिल मराठा फेडरेशनने १८ व १९ जानेवारी रोजी रत्नागिरी येथे मराठा समाजाचे महासंमेलन हॉटेल विवेक येथे आयोजित केलेले असून, या संमेलनात खासदार नारायण राणे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या असामान्य कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून ‘दि ग्रेट मराठा’

हा पुरस्कार देऊन गौरविले जाणार आहे, अशी माहिती मराठा फेडरेशनचे अध्यक्ष सुरेशराव सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी राकेश नलावडे, अप्पा देसाई, प्राची शिंदे उपस्थित होत्या.