सिंधुदुर्ग पर्यटनाला नवी गती; शासन सकारात्मक – विष्णू मोंडकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी शासन सकारात्मक:विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ
पर्यटन व्यावसायिक महासंघाच्या वतीने जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी आवश्यक सुविधाचा प्रस्ताव डॉ प्रज्ञा मनोहर उपसचालक पर्यटन विभाग यांना देण्यात आला

पर्यटन व्यवसाय समस्या व दिशा विषयी घर मिठबावकर तारकर्ली येथे चर्चा सत्र आयोजित करण्यात आले यावेळी गुरु राणे, रवींद्र खानविलकर पर्यटन महासंघ समन्वयक यांनी डॉ प्रज्ञा मनोहर उपसंचालक ,विभागीय पर्यटन कोकण विभाग तसेच उपस्थित पर्यटन अधिकारी यांचे स्वागत करून कार्यक्रमाची सुरवात झाली उपस्थित पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती संस्था प्रतिनिधी यांनी जिल्ह्यातील घन कचरा व्यवस्थापन, पाणी,लाईट आवश्यक पर्यटन व्यवसाय परवाना घेताना अडी अडचणी पर्यटन अधिकारी यांच्या कडे मांडल्या राज्य सरकार पर्यटन विभागा मार्फत स्थानिक स्तरावर चर्चासत्र होण्यासाठी पर्यटन व्यावसायिक महासंघ समन्वयची भूमिका घेतली पर्यटन विषय आवश्यक सुविधा विषयी चर्चा करण्यात आली यावेळी बोलताना डॉ प्रज्ञा मनोहर उपसचालक कोकण पर्यटन विभाग यांनी सांगितलं की चर्चे मध्ये आलेल्या विषयातील महिला पर्यटन व्यवसायिकाना 15 लाख रक्कमेपर्यंत व्याजमुक्त असलेली आई कर्ज योजना सक्षम पणे राबविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेड्युल आणि राष्ट्रीयकृत बँकेची लवकर मिटिंग घेऊ कातळ शिल्प संवर्धन व आवश्यक सोयी सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करणार, जलपर्यटन कालावधी 10 जून पर्यंत वाढवणे नंदी,तलाव. धरण क्षेत्रात बारमाही जलक्रीडा व्यवसाय चालू राहण्यासाठी प्रयत्न केले जाणार तसेच जलक्रीडा व्यवसायात पर्यटकाना आवश्यक सोयी सुविधा, एक दर यासाठी एकखिडकी योजना लागू करणार तसेच जलक्रीडा पर्यटन व्यवसायिकांना व्यवसाय करताना परवाना सुलभ होण्यासाठी जल पर्यटन हंगाम चालू होताना कॅम्प चे आयोजन करून परवाने वितरित केले जाणार तसेच पर्यटन महासंघाची मागणी असलेलो राज्य सरकारच्या अध्यदेशा प्रमाणे पर्यटन पोलीस तसेच राष्ट्रीय, आंतराष्ट्रीय सिंधुदुर्ग स्तरावर पोचविण्यासाठी जिल्ह्यातील पर्यटन पूरक असलेलि जिल्ह्यातील कातळ शिल्प,वल्ड हेरिटेज मध्ये समाविष्ट विजयदुर्ग, सिंधुदुर्ग किल्ला, शासकीय महापूजा मान असलेले श्री क्षेत्र मोरयाचा धोंडा,आंगणेवाडी,कुणकेश्वर मंदिर,छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात उंच पुतळा असलेला राजकोट फोर्ट, वैभववाडी मधील महाभारत काळातील बकासुर वाडा,नव्याने तयार झालेले नापणे येथील काचेचे फुल,सावंतवाडी वाडी येथील राजवाडा आंबोली घाटाच्या पायथ्याशी उभे असलेले राज्यातील पहिले फिश थीम पार्क के एस आर ग्लोबल अ‍ॅक्वेरियम,आंबोली येथील जैवविविधता गंजीफा खेळ,दशावतार सारखे अनेक संस्कृतिक तसेच मांसाहारी जेवणा सोबत शाकाहारी जेवणाची असलेली विविधता अनेक अपरिचित समुद्रकिनारे ऑनलाईन तसेच राष्ट्रीय,आंतराष्ट्रीय स्तरावर पोचवीणे त्यांचे ब्रँडिंग करणेसाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव साजरा करणार तसेच पर्यटन प्रकल्प सोलर सिस्टीम ने जोडण्यासाठी अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव पर्यटन महासंघाने सादर करावा तसेच
कृषी पर्यटन प्रकल्पसाठी आकृषित परवाना घ्यायची गरज नसून जास्तीत जास्त पर्यटन व्यवसायिकांनी आपले व्यवसाय पर्यटन संचालनालय यांच्याशी ऑनलाईन रजिस्टर करावेत असे आवाहन केले तसचे सिंधुरत्न योजनेतून तयार होणाऱ्या पर्यटन प्रकल्प व होम स्टे, कृषी पर्यटन व्यावसायिकांसाठी नोंदणी शिबीर आयोजित केले जाणार स्थानिक पर्यटन समस्या सोडवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी वर्गासोबत मुंबई ला मिटिंग आयोजित केले जाईल ,तसेच प्रादेशिक पर्यटन विकास निधीतुन पर्यटन विकसित करणे रस्ता, वीज, पाणी घन कचरा व्यवस्थापक यासाठी निधी मिळेल असे सांगितले विष्णू मोंडकर अध्यक्ष पर्यटन व्यावसायिक महासंघ यांनी पर्यटन संचालनालय यांनी या चर्चा सत्रा साठी उपस्थित राहून पर्यटन व्यवसायिकाना अपेक्षित प्रतिसाद दिल्याबद्दल पर्यटन अधिकारी वर्गाचे आभार मानले तसेच चर्चसत्र सकारात्मक झाले असे सांगितलं यावेळी नितीन वाळके, टी टी डी एस अध्यक्ष सहदेव साळगावकर,रवींद्र खानविलकर, गुरु राणे, सुमेधा नाईक,महेश सामंत,मिथिलेश मिठबाबकर,मिलिंद झाड,बाळू पडवळ, देवानंद लोकेगावकर, देवेंद्र शेटकर,रेश्मा सावंत,रामा चोपडेकर,संजय केळुसकर,प्रमोद सावंत,नंदू तारी आदी पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.