

राज्यात माहे जून ते सप्टेंबर २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मत्स्यव्यवसाय क्षेत्रात झालेल्या नुकसानीसंदर्भात महसूल व वन विभागाच्या दि. ९ ऑक्टोबर २०२५ व दि. १० ऑक्टोबर २०२५ तसेच मत्स्यव्यवसाय विभागाच्या दि. २९ ऑक्टोबर २०२५ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आलेल्या विशेष मदत पॅकेजच्या अंमलबजावणीत झालेला विलंब, कार्यवाहीचा अभाव आणि अद्याप संबंधित अहवाल सादर न झाल्याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंनी सविस्तर आढावा घेतला. पालकमंत्री नितेश राणेंनी प्रलंबित कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. बैठकीस पदुम चे सचिव एन.रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले आदी उपस्थित होते.












