“पालकमंत्री नितेश राणेंचा मोठा निर्णय; मासेमारी क्षेत्रात येणार ई-चलन प्रणाली”

ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल डेटा व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत दिनांक ९ जानेवारी २०२५ ते २ जून २०२६ या कालावधीत नोंद झालेल्या बेकायदेशीर मासेमारीच्या प्रकरणांची स्थिती तसेच त्यावर करण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईबाबत आज मंत्रालयात माहितीचे सादरीकरण व आढावा बैठक मंत्री मत्यव्यवसाय व बंदरे, महाराष्ट्र राज्य पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत पार पडली.
यावेळी प्रकल्पाच्या कार्यक्षमतेचा आढावा घेऊन बेकायदेशीर मासेमारीविरोधातील कारवाई अधिक प्रभावी करण्यासाठी अद्ययावत डिजिटल डॅशबोर्ड विकसित करण्याचे, तसेच दंड व कारवाई प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि सुलभता आणण्यासाठी नवीन ई-चलन (E-Challan) प्रणाली विकसित करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले.
बैठकीस पदुमचे सचिव एन.रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले तसेच Shnell Drone Technology चे संचालक उपस्थित होते.