पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते क्रीडा संकुलाचा शुभारंभ; स्थानिक खेळाडूंना मोठी संधी

देवगड-जामसांडे नगरपंचायत हद्दीत मंत्री मत्स्यव्यवसाय बंदरे, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते मिनी क्रीडा संकुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या क्रीडांगणामुळे स्थानिक तरुणांना विविध खेळांची संधी मिळणार असून त्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच स्पर्धात्मक क्षमताही वाढणार आहे. तसेच क्रीडापायाभूत सुविधा वाढल्याने पर्यटनाला चालना मिळून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार असल्याचे नमूद केले. तसेच हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने विकसित करून भविष्यात शहराला साजेसा आधुनिक क्रीडासंकुल उभारण्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला.


यावेळी माजी आमदार अजित गोगटे, नगराध्यक्ष साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, सभापती बुवा तारी, तनवी चांदोस्कर, गटनेते शरद ठुकरुल, संदीप साटम, बाळ खडपे, मुख्याधिकारी पाटील, तालुका सचिव योगेश चांदोसकर, नगरसेवक योगेश पाटकर, दया पाटील, नगर अभियंता विवेक खोत यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.