देवगड-जामसांडेत पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते अभ्यासिकेचे भूमिपूजन; स्पर्धा परीक्षांसाठी नवे दालन खुले ।

देवगड : स्पर्धा परीक्षांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने देवगड-जामसांडे येथे अभ्यासिकेच्या प्रकल्पाचे मंत्री मत्स्यव्यवसाय बंदरे, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन पार पडले .
कोकणातील विद्यार्थ्यांचे MPSC-UPSC मधील प्रमाण वाढवण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. या अभ्यासिकेमुळे स्थानिक तरुणांना मार्गदर्शन, संसाधने आणि स्पर्धात्मक वातावरण मिळून प्रशासनात स्थानिकांचे प्रतिनिधित्व वाढेल, असे यावेळी नमूद केले. तसेच ही सुविधा केवळ इमारतीपुरती मर्यादित न ठेवता नामांकित संस्थांमार्फत दर्जेदारपणे चालविण्यावर भर देण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या.


यावेळी माजी आमदार अजित गोगटे, नगराध्यक्ष साक्षी प्रभू, उपनगराध्यक्ष मिताली सावंत, मंडल अध्यक्ष राजा भुजबळ, सभापती बुवा तारी, तनवी चांदोस्कर, गटनेते शरद ठुकरुल, संदीप साटम, बाळ खडपे, मुख्याधिकारी पाटील, तालुका सचिव योगेश चांदोसकर, नगरसेवक योगेश पाटकर, दया पाटील, नगर अभियंता विवेक खोत यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक उपस्थित होते.