
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधत मंत्री मत्स्यव्यवसाय बंदरे, महाराष्ट्र राज्य, पालकमंत्री नितेश राणेंनी देवगड पंचायत समितीला भेट दिली. दरम्यान, देवगड पंचायत समितीला अधिक सक्षम करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, तसेच सध्या मर्यादित असलेल्या निधीत वाढ करण्यात येणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त केला. तसेच पंचायत समितीसाठी आधुनिक व भव्य इमारत उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

यावेळी नागरिकांच्या कामांना प्राधान्य देऊन पारदर्शक व जबाबदारीने काम करण्याचे आवाहनही सदस्य व अधिकाऱ्यांना केले.
यावेळी सभापती गणेश राणे, उपसभापती अमोल लोके, सर्व पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, गटविकास अधिकारी चव्हाण यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.








