
मालवण : भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे काम गतवर्षी मालवण, वायरी, तारकर्ली, देवबाग मार्गावर करण्यात आले. या दरम्यान
रस्त्यांची खोदाई करण्यात आली होती. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तात्काळ निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी आमदार नीलेश राणे यांनी केली होती. त्यानुसार वीज विभागाच्या माध्यमातून सुमारे १ कोटी ४५ लाख रुपये निधी डिपॉझिट करण्यात आला असून लवकरच रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण केली जाणार आहे. मालवण, वायरी, तारकर्ली, देवबाग मार्गावर भूमिगत वीज वाहिनी टाकताना रस्त्यांची खोदाई झाली. मोठ्या प्रमाणात वाहतूक असणाऱ्या या रस्त्यांची डागडुजी तात्काळ होणे गरजेचे आहे. वाहनचालक, पर्यटक तसेच नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी महत्वाची आहे, असे सांगत आमदार नीलेश राणे यांनी तात्काळ निधी उपलब्ध करण्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार सुमारे दीड कोटीचा निधी वीज विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे डिपॉझिट केला आहे. लवकरच रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती देण्यात आली. कोकणशाही मालवण