
देवगड : महाराष्ट्र राज्यामध्ये महानगरपालिका निवडणूकीत भाजपा महायुतीचा दणदणीत विजय संपादन केल्याबद्दल आणि विशेषतः मुंबई महानगरपालीकेमध्ये भाजपा आणि मित्रपक्ष यांचा विजय यासाठी भाजपा देवगड तालुक्याच्या वतीने भाजपा कार्यालय जामसंडे येथे फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजपा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर,जिल्हा सचिव प्रकाश गोगटे, शहराध्यक्ष वैभव करंगुटकर, तालुका कार्यकारिणी सदस्य महेश ताम्हाणकर, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष उषःकला केळुस्कर शक्तीकेंद्र प्रमुख गणपत गावकर, सुभाष धुरी,महिला पदाधिकारी मनस्वी घारे, पाणी पुरवठा समिती सभापती तन्वी चांदोस्कर,स्वच्छता सभापती नगरसेवक बुवा तारी, नगरसेविका आद्या गुमास्ते,माजी नगरसेवक बापू जुवाटकर, व्हि.सी. खडपकर, माजी शहराध्यक्ष योगेश पाटकर,संजय बांदेकर,कमलाकांत भडसाळे, श्री सांगळे,श्री.भडसाळे, कार्यालयीन कर्मचारी अक्षता घाडी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कोकणशाही देवगड जामसंडे