मुंबई : भारत आणि महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने जो अंदाज व्यक्त केलेल्या अंदाजानुसार ठाणे, ठाणे उपनगर नवी मुंबई आणि मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवर हलका गारवा जाणवेल.
उत्तरेकडे कडाक्याची थंडी पडली असून राज्यातील अनेक जिल्ह्यातील पारा 10 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. उत्तर भारतातून थंड हवेचे प्रवाह वाढल्याने राज्यात थंडी वाढत आहे. महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भ या ठिकाणी थंडीचा कडाका वाढला आहे. याचपार्श्वभूमिवर भारत आणि महाराष्ट्रासाठी हवामान खात्याने जो अंदाज व्यक्त केलेल्या अंदाजानुसार ठाणे, ठाणे उपनगर नवी मुंबई आणि मुंबई, पालघर आणि कोकण किनारपट्टीवर 20 ते 22 अंश इतके किमान तापमान असल्यामुळे याठिकाणी हलका गारवा जाणवेल.
तसेच पुणे आणि नाशिकजवळील ग्रामीण भागात पुढील दोन दिवस 13 अंश किमान तापमान स्थिर राहील. त्यामुळे चांगली ऊब अनुभवायला मिळेल. जेऊर, धुळे, निफाड, परभणी या जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा कमी राहणार आहे. त्याचसोबत विदर्भ आणि मराठवाड्यात कडाक्याची थंडी राहणार आहे. उत्तरेकडील भागात गारठा वाढत चालला असून उत्तरेकडील गारठ्याचा परिणाम आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे. यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांत थंडीमध्ये झपाट्याने वाढ झाली असून नागरिकांना पहाटे आणि रात्री तीव्र गारठ्याचा सामना करावा लागत आहे.
मात्र डिसेंबरच्या अखेरपर्यंत हवामान थंड राहील, तापमानाचा पारा कमीच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील दोन दिवसांतही या भागात हवामान साधारण असंच राहणार असून थंडी वाढण्याची चिन्हे नाहीत. तसेच हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 16 डिसेंबर रोजी तामिळनाडू, जम्मू आणि काश्मीर, पुद्दुचेरी, हिमाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होईल. तर महाराष्ट्रात अद्याप पावसाचे कोणतेच चिन्ह आढळत नसल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. दरम्यान ही थंडी जानेवारीपर्यंत टिकून राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोकणशाही मुंबई
