मालवण : सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ग्रामीण रुग्णालयात १९ डिसेंबरला कर्करोग तपासणी व जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत कर्करोग मोबाईल व्हॅनच्या सहाय्याने मुख कर्करोग, स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग यांची तपासणी केली जाणार आहे. नागरिकांमध्ये कर्करोगाच्या लक्षणांबद्दल जागरुकता निर्माण करण्याचा आणि प्राथमिक अवस्थेतच रोगनिदान करण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर्करोगाची काही प्रमुख लक्षणे ज्यात मुख कर्करोग- दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधीसाठी तोंडात जखमा असणे, लाल किंवा पांढरा रक्तस्राव होणे, चट्टा दिसून येणे, तोंड उघडण्यास त्रास होणे, स्तन कर्करोग- यात स्तनामध्ये गाठ जाणवणे, स्तनाच्या आकारात बदल होणे, स्तनग्रंथीतून पू किंवा रक्तस्राव होणे, गर्भाशय मुख कर्करोग- यात मासिक पाळीव्यतिरिक्त योनीतून रक्तस्राव होणे. मासिक पाळीचे चक्र बंद झाल्यावर रक्तस्राव होणे, शारीरिक संबंधानंतर रक्तस्राव होणे, योनी मार्गातून दुर्गंधीयुक्त स्राव येणे याचा समावेश आहे. यासाठी कर्करोग मोबाईल व्हॅन उपलब्ध असणार आहे. या व्हॅनमध्ये आवश्यक उपकरणे आणि तज्ज्ञ उपलब्ध असतील. डॉक्टर नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन ग्रामीण रुग्णालय, मालवणतर्फे केले आहे. कोकणशाही मालवण
