सावंतवाडी : सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालय सुवर्ण महोत्सवी बक्षीस वितरण समारंभाचा दिमाखदार शुभारंभ आज सातार्डा महापुरुष मंदिर सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा महाराष्ट्र प्रदेश युवा नेते विशाल परब यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी बोलताना विशाल परब यांनी सातार्डा परिसरातील नागरिकांनी जपलेल्या वाचन संस्कृतीचे कौतुक केले.
आजच्या डिजिटल युगात टिळक ग्रंथालयाच्या माध्यमातून होत असलेला वाचन संस्कृतीचा सुवर्ण महोत्सव हा खरोखरच गौरवास्पद आहे. याचे कौतुक करण्याचा मान मला या कार्यक्रमाच्या उद्घाटनातून मिळाला हे माझे खरोखरच भाग्य असून याचा मला मनापासून अभिमान आहे असे प्रतिपादन यावेळी विशाल परब यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर दत्ता कवठणकर , मंगेश म्हस्के अनंत वैदय, शर्वाणी गावकर, श्रुतिका बागकर, रुपेश राऊळ, संदिप रावनी प्रभु, अजित कवठणकर, प्रतिक्षा मांजरेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते कोकणशाही सावंतवाडी
