‘रन फॉर युनिटी’ एकता दौड ला निवती पोलीस ठाणे यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

परुळे : राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे औचित्य साधत निवती पोलीस ठाणे यांच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ एकता दौड आयोजित करण्यात आली होती. याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या भव्य दौड मध्ये नागरिक, एस. एल देसाई विद्यालय पाटचे विद्यार्थी व शिक्षक, पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.
पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर आणि अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या संकल्पनेतून निवती पोलीस
ठाण्याच्यावतीने एकता दौड घेण्यात आली. या दौड मध्ये निवती पोलीस निरीक्षक भिमसेन गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक दिलीप शेट्ये, नितीन पाटील, पोलीस अंमलदार सचिन कुंभार, विक्रांत किनळेकर, परण पोकळे, मारुती कांदळगावकर, सावंत, पोलिस पाटील श्वेता चव्हाण, प्रतिक्षा मुंडये, दादू चव्हाण, आर्या आमडोसकर, संदेश पवार, महानंदा गोसावी, जान्हवी खडपकर, शर्मिला जळवी, महेश कासकर, अक्षय राऊळ, प्रियदर्शि कदम, श्रृंगारे, जोगेश सारंग, दया तांडेल, सुबोध सावंत, कोचरेकर, वेंगुर्लेकर उपस्थित होते. कोकणशाही परुळे निवती