‘रन फॉर युनिटी’ एकता दौडसाठी आचरा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

आचरा : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आणि आचरा पोलीस ठाण्याच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आचरा ग्रामपंचायत ते आचरा बीच अशी भव्य ‘रन फॉर युनिटी’ एकता दौड आयोजित करण्यात आली होती. याची सुरुवात आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस,पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

यावेळी आचरा उपसरपंच संतोष मिराशी, व्यापारी संघटना अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर,ग्रामपंचायत सदस्या किशोरी आचरेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास टेंबूलकर, मिनाक्षी देसाई, पोलीस कर्मचारी मिलिंद परब,अमित हळदणकर, सौ परब,स्वाती आचरेकर, पोलीस पाटील जगन्नाथ जोशी, विठ्ठल धुरी, सिताराम सकपाळ,दिनेश पाताडे अमोल पेडणेकर, यांसह अन्य पोलीस पाटील, होमगार्ड, विद्यार्थी, ग्रामस्थ आदी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी एकतेची शपथ घेतली. कोकणशाही आचरा