विशाल परब यांच्या उपस्थितीत वझरे येथील असंख्य ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या उत्साहात भाजपात पक्ष प्रवेश

दोडामार्ग, तालुक्यातील वझरे येथील असंख्य ग्रामस्थांनी जनार्दन नाईक यांच्या नेतृत्वाखाली व युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी दयानंद जाधव, उत्तम जाधव, रमेश जाधव, सागर जाधव, गोपाल जाधव, लक्ष्मण जाधव यांच्यासह महिला कार्यकर्त्यांमध्ये दर्शना जाधव, जयंती जाधव, रेणुका जाधव, रुक्मिणी जाधव, लक्ष्मी जाधव, सरस्वती जाधव यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. याशिवाय हरिचंद्र गवस, गौतम गवस, दिलीप गवस, सुभाष गवस, गणपत गवस, समीर गवस, आनंद ताटे, आनंद म्हाडगूत, आनंद पर्येकर, श्रीकृष्ण पर्येकर, कृष्ण पर्येकर, निखिल पर्येकर, अजित काळकेकर, रामा खोत, विठोबा उसपकर, जनार्दन नाईक, प्रसाद नाईक, सरिता नाईक, संदीप गवस, प्राची गवस, प्रशांती नाईक, शशिकला गवस, यशवंत खोत यांनी प्रवेश केला.
जनार्दन नाईक यांच्या नेतृत्वाखाली वझरे गावातील अन्य पक्षातील कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
महिला, युवक आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग असलेल्या या प्रवेश सोहळ्यात गावाच्या विकासासाठी नवी ऊर्जा आणि विश्वास निर्माण झाला आहे.
या प्रसंगी बोलताना मी स्पष्ट केले की — “वझरे गावातील सर्व समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पक्ष वचनबद्ध आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखत त्यांना संघटनेत योग्य ती जबाबदारी दिली जाईल.”

याप्रसंगी श्री. परब यांनी वझरे गावातील समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने लक्ष देण्याची ग्वाही दिली. ते म्हणाले, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वझरे गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भाजप पक्ष कार्यक्षम आहे. तुमच्या समस्या सोडवण्यात येतील, तसेच प्रवेश केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा भाजपामध्ये योग्य तो सन्मान राखला जाईल. यावेळी माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, शहराध्यक्ष राजेश फुलारी, शिरिष नाईक, जनार्दन नाईक, महेश गवस, नागेश पर्येकर, मंगेश नाटेकर, राजू वारंग, सुहास दळवी, नाना देसाई आणि संजू उसपकर आदी मान्यवर उपस्थित होते. कोकणशाही दोडामार्ग